IPL 2023 Points Table: पंजाबची मोठी झेप! मुंबई इंडियन्स आहे तरी कुठे

Kiran Mahanavar

आयपीएलच्या 16 व्या हंगामात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 13 धावांनी पराभव करून या मोसमातील चौथा विजय नोंदवला.

पंजाब किंग्जचा संघ आता गुणतालिकेत 5 व्या स्थानावर पोहोचला आहे, ज्यामध्ये संघाचे आता 8 गुण आहेत, तर निव्वळ धावगती -0.162 आहे.

या हंगामात पंजाब संघाने आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यापैकी 3 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

राजस्थान रॉयल्स संघ आतापर्यंत 6 पैकी 4 सामने जिंकून टॉप-4 मध्ये पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान संघाचा निव्वळ धावगती सध्या 1.043 आहे.

लखनौ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 4 सामने जिंकले आहेत आणि या क्षणी संघाचा निव्वळ धावगती 0.547 आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ 8 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्यामध्ये संघाने आतापर्यंत 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि त्यांचा निव्वळ धावगती 0.355 आहे.

गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर गुजरात टायटन्स संघ आहे, ज्याने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि संघाचा निव्वळ धावगती 0.212 आहे.

Hardik Pandya

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे, तर आता मुंबई इंडियन्सचा संघ 7व्या स्थानावर आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.