IPL 2024 Auction : हे 5 खेळाडू राहू शकतात लिलावात अनसोल्ड

अनिरुद्ध संकपाळ

कोरी एंडरसन

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसरनने वनडेमध्ये फक्त 36 चेंडूत शथक ठोकलं होतं. त्याची यंदाच्या लिलावात 1.5 कोटी बेस प्राईस आहे. मात्र आता अमेरिकेकडून खेळणारा कोरी अनसोल्ड राहण्याची शक्यता आहे.

क्रिस जॉर्डन

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टी 20 स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जातो. मात्र त्याचे आयपीएलमधील ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे. त्याने 34 आयपीएल सामन्यात 10 च्या सरसारीने धावा दिल्या आहेत. तो अनसोल्ड राहण्याची दाट शक्यता आहे.

अँजेलो मैथ्यूज

श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने देखील आपली बेस प्राईस 1.5 कोटी रूपये ठेवली आहे. तो आपल्या कारकिर्दीच्या उतरंडीला लागला आहे. त्याला 2017 पासून आयपीएल खेळण्याची संधी मिळालेली नाही. याहीवेळी तो अनसोल्ड राहण्याची शक्यता आहे.

सीन एबॉट

सीन एबॉट 2023 चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. मात्र त्याची टी 20 क्रिकेटमधील कामगिरी निराशाजनक आहे. त्याने तीन आयपीएल सामन्यात 54 चेंडूत 104 धावा दिल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यांमध्ये 9 च्या सरासरीने धावा दिल्या आहेत.

केदार जाधव

भारतीय संघाकडून खेळलेल्या केदार जाधवला गेल्या काही वर्षापासून आपला फॉर्म दाखवता आलेला नाही. 2022 मध्ये तो अनसोल्ड राहिला होता. 2023 मध्ये तो मराठीतून समालोचन करत होता. मात्र दुखापतग्रस्त खेळाडूच्या बदल्यात त्याला आरसीबीने घेतले होते. मात्र आता त्यााल रिलीज केले असून तो देखील यंदाच्या लिलावात अनसोल्ड राहण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.