इरफान पठाणने परदा उठाया! पत्नीचा चेहरा सोशलवर व्हायरल

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो.

अलीकडेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करणारा फलंदाज सर्फराज खानला टीम इंडियामध्ये स्थान न दिल्याबद्दल आपल्या प्रतिक्रियेने सर्वांना आश्चर्यचकित केले.

यावेळी त्याची चर्चा क्रिकेटमुळे नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे होत आहे.

खरं तर लग्नाच्या 8 वर्षात पहिल्यांदाच त्याने आपल्या पत्नीच्या चेहऱ्याची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

2016 मध्ये लग्न झालेले भारतीय दिग्गज आपल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतात पण यावेळी त्याने असे काही केले ज्यामुळे त्याची चर्चा होत आहे.

लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त इरफान पठाणने पत्नी सफा बेगसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोची खास गोष्ट म्हणजे यात त्याने पत्नीचा चेहरा लपवलेला नाही.

यापूर्वी तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या सर्व फोटोंमध्ये सफा एकतर हिजाबमध्ये दिसली होती किंवा तिने आपला चेहरा हाताने लपवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.