डोंगराखाली बेचिराख इर्शाळवाडी; अनेकांचे मोडले संसार, परिसरात भयाण शांतता

सकाळ डिजिटल टीम

लोकांचं जीवन कष्टमय

Irshalwadi Landslide : डोंगरमाथ्यावर राहणाऱ्या लोकांचे जीवन किती कष्टमय असते, हे इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर (Irshalwadi Landslide) समोर आले आहे.

Irshalwadi Landslide

इर्शाळवाडीत भयाण शांतता

डोंगराखाली बेचिराख झालेल्या इर्शाळवाडीत आता भयाण शांतता पसरली आहे.

Irshalwadi Landslide

दुर्गंधीने गुदमरतोय श्‍वास

मातीच्या ढिगाऱ्यातून दिसणाऱ्या घराची उडालेली छपरे, त्याखाली दबलेली भांडीकुंडी, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला मातीचा ढिगारा आणि त्या ढिगाऱ्यातून येणाऱ्या दुर्गंधीने श्‍वास गुदमरून जाईल, अशी भयाण स्थिती सध्या इर्शाळवाडीत आहे.

Irshalwadi Landslide

ढिगाऱ्याखाली ५७ नागरिक बेपत्ता

मातीचा ढिगारा आजही इतका भुसभुसीत आहे की त्यावरून चालताना पाय मातीत रुततात. ढिगाऱ्याखाली बेपत्ता झालेले ५७ नागरिक आणि त्यांच्या गुराढोरांचे काय झाले, असा विचार मनात आला की अंगावर काटा येतो.

Irshalwadi Landslide

इर्शाळवाडीची अवस्‍था पाहून नातेवाईक हताश

दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी असेल, त्‍या स्‍थितीत वाडी सोडली. चाळीस दिवसांत इर्शाळवाडीच्या बातम्या सतत प्रसारमाध्यमांवर झळकत होत्या; मात्र प्रत्यक्ष इर्शाळवाडीची आज जी अवस्‍था आहे, ती पाहून बचावलेले नातेवाईक हताश होत आहेत.

Irshalwadi Landslide

'सरकारनं आम्‍हाला सर्वकाही दिलं'

सरकारने आम्‍हाला सर्वकाही दिले, अगदी कपडे शिवण्याच्या सुईपासून सर्व सुखसोयी दिल्या; पण आम्ही आमची वाडी आणि नातेवाईक पुन्हा पाहू शकणार नसल्याची खंत असल्‍याचे पदी वाघ या महिलेने भावनिक होत सांगितले.

Irshalwadi Landslide

अनेकांचे मोडले संसार

मोडलेला संसार आणि आपल्या नातलगांच्या आठवणीमुळे वयस्कर मंडळी वाडीवर जाण्याचे टाळतात. तरुणच वाडीवर जाऊन राहिलेले साहित्य शोधण्याचा प्रयत्न करताहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irshalwadi Landslide