अंकिता खाणे (Ankita Khane)
सूर्याशिवाय पृथ्वीवरील जीवन शक्य नाही. हा आपल्या सौरमालेचा 'नेता' आहे, ज्याभोवती अनेक ग्रह फिरतात.
नासाच्या मते, आपला सूर्य हा 4.5 अब्ज वर्ष जुना तारा आहे.
पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा देखील सूर्य आहे.
हायड्रोजन आणि हेलियमच्या अफाट उर्जेसह हा सूर्य पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंदाजे 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे
म्हणूनच 3 लाख प्रति किलोमीटर वेगाने प्रवास करणाऱ्या प्रकाशाला सूर्यापासून पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिटे 20 सेकंद लागतात.
सूर्य पृथ्वीपेक्षा सुमारे 100 पट रुंद आहे आणि सर्वात मोठा ग्रह, गुरु पेक्षा सुमारे 10 पट रुंद आहे.
नासाच्या मते, सुमारे 13 लाख पृथ्वी सूर्याच्या आत बसू शकतात.
आपल्या सौरमालेतील सूर्य हा एकमेव तारा आहे. हे आपल्या सौरमालेचे केंद्र आहे आणि त्याचे गुरुत्वाकर्षण सौर मंडळाला एकत्र ठेवते.
सूर्याचा जो भाग आपण पृथ्वीवरून पाहतो त्याला फोटोस्फियर म्हणतात. हा संपूर्ण भाग पृथ्वीला प्रकाश देतो, त्यामुळे येथे जीवन शक्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.