'चांद्रयान-३'ने टिपले चंद्राचे नवीन फोटो

अंकिता खाणे (Ankita Khane)

चांद्रयान-3 मोहीम आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे.

Chandrayaan-3 | Esakal

विक्रम लँडर बुधवारी (23 ऑगस्ट)ला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल.

Chandrayaan-3 | Esakal

या प्रवासादरम्यान विक्रम लँडरवरील कॅमेऱ्याने चंद्राचे आणखी काही नवे फोटो टिपले आहेत. इस्रोने आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरून हे फोटो शेअर केले आहेत.

Chandrayaan-3 | Esakal

इस्रोने आपल्या पोस्टमध्ये याबाबत अधिक माहिती दिली आहे. चंद्राचे हे फोटो लँडर हॅजार्ड डिटेक्शन अँड अव्हॉईडन्स कॅमेऱ्याने (LHDAC) टिपले आहेत.

Chandrayaan-3 | Esakal

हा कॅमेरा चांद्रयानाच्या लँडिंगसाठी सुरक्षित जागा शोधण्यास मदत करेल. चंद्रावर बहुतांश ठिकाणी खडकाळ आणि खड्डे असलेली जमीन आहे.

Chandrayaan-3 | Esakal

त्यामुळे लँडिंगसाठी एखादी सपाट जागा शोधणं गरजेचं आहे. यासाठी हा कॅमेरा उपयोगी ठरणार आहे.

Chandrayaan-3 | Esakal

'चांद्रयान-3'ने टिपलेले हे फोटो चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळचे आहेत. चंद्राचा हा भाग आतापर्यंत मानवापासून लपून राहिला होता. या चार फोटोंमध्ये चंद्रावरील विविध क्रेटर्स दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrayaan-3 | Esakal