लाँचसाठी 'आदित्य' सज्ज! इस्रोने पोस्ट केले नवीन फोटो

Sudesh

'आदित्य L1'

आदित्य एल-1 ही भारताची महत्त्वाकांक्षी सौरमोहीम आहे. इस्रोची ही पहिलीच सूर्य मोहीम असणार आहे.

ISRO Aditya L1 | eSakal

श्रीहरीकोटा

श्रीहरीकोटा येथे असणाऱ्या सतीश धवन स्पेस सेंटरवरुन या उपग्रहाचं लाँचिंग होणार आहे. यासाठी PSLV रॉकेटचा वापर करण्यात येईल.

ISRO Aditya L1 | eSakal

PSLV सज्ज

पीएसएलव्ही-सी57 या रॉकेटच्या मदतीने 'आदित्य' उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येईल. यासाठी सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लाँचपॅडवर हे रॉकेट सज्ज झाले आहे.

ISRO Aditya L1 | eSakal

सूर्याचा अभ्यास

सूर्याचा पृष्ठभाग, त्यावरील तापमान आणि सौरवादळे अशा विविध गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी आदित्य उपग्रह हा L1 या पॉइंटवर ठेवण्यात येईल.

ISRO Aditya L1 | eSakal

L1 पॉइंट

L1 हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणारा एक लँग्रेज पॉइंट आहे. ही जागा पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे.

ISRO Aditya L1 | eSakal

लाँच कधी?

आदित्य उपग्रह शनिवार, 2 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येईल. सुमारे चार महिने प्रवास केल्यानंतर हा उपग्रह L1 पॉइंटवर पोहोचेल.

ISRO Aditya L1 | eSakal

सात पेलोड्स

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य उपग्रहामध्ये विविध प्रकारची सात उपकरणे असणार आहेत. सूर्यासोबतच L1 पॉइंटजवळ असणाऱ्या कणांचा अभ्यास हा उपग्रह करेल.

ISRO Aditya L1 | eSakal

बजेट

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रोच्या या सौर मोहिमेचं बजेट सुमारे 400 कोटी रुपये आहे. 2019 सालापासून याची तयारी सुरू आहे.

ISRO Aditya L1 | eSakal

कधीपर्यंत चालणार?

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेचा कालावधी 5.2 वर्षे एवढा असणार आहे. यामुळे सूर्याबाबत अधिक माहिती आपल्याला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO Aditya L1 | eSakal