'ज्युनियर बुमराह'ची पहिली झलक आली समोर

Kiran Mahanavar

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात महत्त्वाचा सामना खेळला गेला. या रोमांचक सामन्यात मुंबईने हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला.

या सामन्यात पुन्हा एकदा मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली.

हा सामना पाहण्यासाठी बुमराहची पत्नी संजनाही वानखेडे स्टेडियमवर आली होती.

यावेळी बुमराहच्या मुलाची झलकही कॅमेऱ्यात कैद झाली.

जसप्रीत बुमराहचा मुलगा अंगद याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अंगद आई संजनाच्या मांडीवर बसला होता.

बुमराहच्या मुलाचा चेहरा चाहत्यांना पहिल्यांदाच पाहायला मिळाला.

या सामन्याच्या दिवशी बुमराहची पत्नी संजनाचाही वाढदिवस होता. अंगदचा जन्म ४ सप्टेंबर २०२३ रोजी झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.