Indian Army : जवान वैभव भोईटेंना अखेरचा निरोप; दीड वर्षाच्या चिमुरडीनं दिला भडाग्नी

सकाळ डिजिटल टीम

वाहन अपघातात जवान वैभव भोईटे शहीद

फलटण शहर : लडाख येथील लेहजवळ वाहन अपघातात हुतात्मा झालेले जवान वैभव संपतराव भोईटे (वय २३) यांना भोईटेवस्ती, राजाळे (ता. फलटण) येथे शासकीय इतमामात मानवंदना देत हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

Jawan Vaibhav Bhoite Martyred

दीड वर्षाची मुलगी हिंदवीने दिला भडाग्नी

या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. वैभव भोईटे यांना वडील संपतराव भोईटे यांनी व कडेवर बसलेल्या दीड वर्षाची मुलगी हिंदवीने भडाग्नी दिला.

Jawan Vaibhav Bhoite Martyred

वाहन खोल दरीत कोसळून नऊ जवान हुतात्मा

लडाखमधील लेह जिल्ह्यात राजधानी लेहजवळ क्यारी गावातून जाताना भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जवान हुतात्मा झाले. यामध्ये राजाळे (ता. फलटण) येथील वैभव संपतराव भोईटे हे हुतात्मा झाल्याचे वृत्त समजताच संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली.

Jawan Vaibhav Bhoite Martyred

नागपंचमीचा सण साजरा न करून वाहिली श्रद्धांजली

राजाळे गावात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून व नागपंचमीचा सण साजरा न करून श्रद्धांजली वाहिली. हुतात्मा वैभव भोईटे यांचे पार्थिव लेहवरून दिल्ली, हैदराबादमार्गे पुणे येथे विमानाने आणण्यात आले.

Jawan Vaibhav Bhoite Martyred

गावोगावी भोईटे यांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर

पुणे येथून विशेष वाहनातून राजाळे येथे आणण्यात आले. लोणंद ते फलटण व फलटण ते राजाळे या मार्गावरील प्रत्येक गावामध्ये रस्त्याच्या दुतर्फा व मध्यभागी रांगोळी काढण्यात आली होती. गावोगावी भोईटे यांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावण्यात आले होते.

Jawan Vaibhav Bhoite Martyred

'जब तक सूरज चाँद रहेगा वैभव तेरा नाम रहेगा'

राजाळे येथे वैभव यांच्या पार्थिवाचे आगमन सायंकाळी आठ वाजता झाले. तेथून भोईटे वस्ती येथे फुलांनी सजविलेल्या ट्रॉलीतून साडेआठच्या सुमारास निवासस्थानी आणण्यात आले. या वेळी वीर जवान वैभव भोईटे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, जब तक सूरज चाँद रहेगा वैभव तेरा नाम रहेगा, इन्कलाब झिंदाबाद आशा घोषणांनी आसमंत निनादला.

Jawan Vaibhav Bhoite Martyred

तिरंगा त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द

राजाळे येथून भोईटेवस्ती येथे त्यांच्या निवासस्थानी पार्थिव मुख दर्शनासाठी आणल्यानंतर त्यांची आई, वडील, पत्नी व कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. ज्या तिरंग्यात लपेटून वैभव यांचे पार्थिव आणण्यात आले, तो तिरंगा त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. यानंतर त्यांच्या पार्थिवास वडील संपतराव भोईटे यांनी व कडेवर बसलेल्या दीड वर्षाची मुलगी हिंदवीने भडाग्नी दिला. (फोटो : किरण बोळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jawan Vaibhav Bhoite Martyred