Ola अन् Chetak ला टक्कर देणारी JeetX इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

सकाळ डिजिटल टीम

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढताना दिसत आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनाचं उत्पादन करत आहेत. यातच काही नवीन कंपन्यांचाही समावेश आहे.

iVOOMi Energy ने नुकतीच आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर जीतएक्स (JeetX) भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. या स्कूटरची प्रारंभिक किंमत 99,999 रुपये आहे.

iVOOMi Energy दावा आहे की, JeetX ही RTO नोंदणीकृत, ARAI प्रमाणित हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. जी भारतात बनलेली आहे.

iVOOMi JeetX ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) द्वारे प्रमाणित या स्कूटरचा वेग 70 किमी प्रतितास आहे.

ही इलेक्ट्रिक स्कूटर JeetX आणि JeetX180 या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

iVOOMi JeetX इको मोडमध्ये पूर्ण चार्ज केल्यावर 100 किमी आणि रायडर मोडमध्ये सुमारे 90 किमीची रेंज ऑफर करते. JeetX180 इको मोडमध्ये 200 किमी आणि स्पोर्ट्स मोडमध्ये सुमारे 180 किमीची रेंज देणार, असा दावा कंपनीने केला आहे.

iVOOMi ची ई-स्कूटर JeetX भारतातील हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये Ola S1 Pro, Bajaj Chetak आणि TVS iQube इलेक्ट्रिकशी स्पर्धा होणार आहे.

JeetX सिरीज iVOOMi डिलरशिपवर 1 लाख ते 1.4 लाख रुपयांच्या व्हेरिएंटनुसार उपलब्ध असेल. ही स्कूटर 1 सप्टेंबर 2022 पासून बुक केली जाऊ शकते. JeetX व्हेरिएंटची डिलिव्हरी 1 सप्टेंबरपासून सुरू होईल, तर JeetX180 ची डिलिव्हरी सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होईल.

याशिवाय कंपनी 10 सप्टेंबर 2022 पर्यंत ही स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तिच्या नवीन JeetX सिरीजमधील ई-स्कूटर्ससह 3,000 रुपये किमतीच्या अॅक्सेसरीज मोफत देणार आहे.

इलेक्ट्रिक टू-व्हीलर JeetX मध्ये अॅक्सेसरी म्हणून ड्युअल रिमूव्हेबल बॅटरी सेटअप देखील असेल. जे ग्राहकांना ड्रायव्हिंग रेंज वाढवण्यासाठी ड्युअल बॅटरी कॉन्फिगरेशनसह त्यांचे ई-स्कूटर अपग्रेड करण्यास सक्षम करेल.

कंपनीने आपल्या सर्व ई-स्कूटर्सवर ड्युअल रिमूव्हेबल बॅटरी सेटअप ऑफर करणारी भारतातील पहिली कंपनी असल्याचा दावा देखील केला आहे.

नवीन JeetX ई-स्कूटर चार मॅट रंग पर्यायांमध्ये येते - स्कार्लेट रेड, इंक ब्लू, पॉश व्हाइट आणि स्पेस ग्रे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.