नागपंचमीला जिवती पूजन का करतात?

धनश्री भावसार-बगाडे

नागपंचमी

श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी नागाच्या पूजेबरोबरच जिवतीही पूजा करतात.

Jivti Pooja | esakal

जिवती

श्रावण महिना सुरू झाला की, महाराष्ट्रात जिवती पूजन करण्याची परंपरा आहे.

Jivti Pooja | esakal

जिवती पूजन

श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केले जाते. आपल्या मुलाबाळांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. यातील प्रत्येक प्रतिमेचा विशेष अर्थ आहे.

Jivti Pooja | esakal

नरसिंहाची प्रतिमा

भगवान विष्णूंच्या या अवतारात भक्त प्रल्हादाचे दैत्यापासून त्यांनी रक्षण केले. नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात असे मानले जाते.

Jivti Pooja | esakal

कालिया मर्दन

महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो.

Jivti Pooja | esakal

जिवती

जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. 

Jivti Pooja | esakal

बुध व बृहस्पती

बुधाचं वाहन हत्ती असून हे उन्मत्ततेवर अंकूश लावण्याचं प्रतिक आहे. तर बृहस्पतीचं वाहन वाघ असून हे अहंकाराच्या दमनाचे प्रतीक आहे. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा शिकवते.

Jivti Pooja | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jivti Pooja | esakal