CA Rachana Ranade : मराठी माणसाला शेअर मार्केटच गणित सोपं केलं ते 'या' युट्यूबरने

Vaibhav Mane

रचना रानडे आणि पती अक्षय रानडे

सीए रचना रानडे शिक्षिका एनफ्लुएंसर आणि उद्योजिका म्हणून प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व सर्वांच्याच परिचयाचे आहे.

CA Rachana Ranade | Sakal

पहिल्याच प्रयत्नात सीए

पहिल्याच प्रयत्नात सीए झाल्यावर सीए आणि एमबीए च्या विद्यार्ध्यांना जवळपास १० वर्षे शिकवले.

CA Rachana Ranade | Sakal

आर्थिक साक्षरता

२०१९ साली त्यांनी आर्थिक साक्षरता आणि शेअर मार्केटचा अभ्यास यासाठी युट्यूब चॅनेल CA Rachana Phadke Ranade इंग्रजी भाषेतून चालू केले. तसेच..

CA Rachana Ranade | sakal

ऑनलाइन कोर्सेस

इंग्रजी भाषेमधून आर्थिक व्यवस्थापनाचे आणि शेअर मार्केटचे ऑनलाइन कोर्सेस चालू केले.

CA Rachana Ranade | sakal

रचना रानडे आणि पती अक्षय रानडे

आजपर्यंत २०,००० पेक्षा अधिक विद्यार्ध्यांनी या कोर्सेस मधून ज्ञान मिळवले आहे.

CA Rachana Ranade | sakal

मराठी युट्यूब चॅनल

आर्थिक साक्षरतेचे ज्ञान आणि त्याची जनजागृती अजून मोठ्या प्रमाणात मराठी माणसापर्यंत कशी पोहोचवता येईल या उद्देशाने १ मे २०२२ रोजी त्यांनी मराठी युट्यूब चॅनल CA Rachana Ranade (Marathi) ची सुरुवात केली. आणि...

CA Rachana Ranade | sakal

शेअर मार्केट

मराठी माणूस आर्थिक साक्षर व्हावा त्यासाठी त्यांनी मराठी भाषेमधून देखील आर्थिक व्यवस्थापनाचे आणि शेअर मार्केटचे ऑनलाइन कोर्सेस जानेवारी २०२३ मध्ये चालू केले.

CA Rachana Ranade | sakal

त्यांचा मुलगा मेघ आणि आई रचना रानडे

प्रत्येक भारतीयाने आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हावे असे रचना मॅडम चे उद्दिष्ट आहे त्यासाठी हर घर इन्व्हेस्टर या उपक्रमाची त्यांनी सुरुवात केली.

CA Rachana Ranade | sakal

त्याांचा मुलगा मेघ आणि पती अक्षय रानडे

मराठी युट्यूब चॅनल CA Rachana Ranade (Marathi) वर्षभरातच त्या चॅनलचे ५.५ लाखांपेक्षा जास्त सब्स्क्राइबर झाले.

CA Rachana Ranade | sakal

संगीत विशारद

त्या बीकॉम, पीजीडीएम, एमबीएस आणि सीए आहेत आणि  हे सर्व करत असताना देखील त्यांनी आपली गायनाची आवड जोपासली आणि त्यांनी गायनातील संगीत विशारद पदवी सुद्धा मिळवली. 

CA Rachana Ranade | sakal

उत्कृष्ट खवय्ये

त्यांचे पती अक्षय रानडे हे उत्कृष्ट खवय्ये आहेत.

रचना रानडे

रचना रानडे धडपडणाऱ्या अनेक युवक युवतींच्या आदर्श आहेत.

इंग्रजी युट्यूब चॅनल

CA Rachana Phadke Ranade  इंग्रजी भाषेतून चालू केला ज्याचे आज ४४ लक्ष सब्स्क्राइबर आहेत.

CA Rachana Ranade | sakal

शालेय शिक्षण

रचना रानडे यांचे शालेय शिक्षण अभिनव इंग्रजी विद्यालयातून झाले. आणि अक्षय यांचे रमणबाग शाळेतून त्यानंतर दोघांनी BMCC मधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सऑफ इंडिया मधून CA ची पदवी मिळवली .

CA Rachana Ranade | sakal

त्यांच्यामुळे आर्थिक साक्षर होणारे लोक आज जगभरात आहेत.

CA Rachana Ranade | sakal

नास समिट २०२२

त्यांना नास समिट २०२२ साठी दुबई मध्ये आमंत्रित करण्यात आले होते २०० ते २५० पेक्षा अधिक प्रेक्षकवर्ग उपस्थित होता आणि २० पेक्षा जास्त देशांतून लोक सहभागी झाली होती त्यात अमेरिका, सिंगापूर, पाकिस्तान, दुबई अश्या अनेक देशांचा समावेश होता.

CA Rachana Ranade | sakal

पतीची उत्तम साथ

त्यांचे पती सीए अक्षय रानडे यांनी खाजगी कंपनीतील नोकरी सोडून या प्रवासात त्यांना उत्तम साथ दिली, आणि आजही हा प्रवास यशस्वीरित्या ते दोघे एकत्रित करत आहेत.

CA Rachana Ranade | sakal

त्यांच्या मराठी चॅनलमुळे काही मोलकरणीने सुद्धा बँक अकाउंट काढले ही त्यांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.

CA Rachana Ranade | sakal

कॉन्टेन्ट क्रिएटरला सल्ला

आम्ही त्यांना विचारलं इतर कॉन्टेन्ट क्रिएटरला तुम्ही काय सल्ला द्याल ? तेव्हा त्या म्हणाल्या कोणताही कॉन्टेन्ट अतिशय जबाबदारीने काढला पाहिजे.

CA Rachana Ranade | sakal

प्रभावी वक्तृत्व शैली

त्यांच्या अतिशय प्रभावी वक्तृत्व शैलीमुळे लोक एकवेळ मालिका बघणं विसरतात पण शेअर मार्केट बद्दलचे माहिती बघणे हे विसरत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CA Rachana Ranade | Sakal