या अभिनेत्रीमुळे देशात वाढली कंडोमची विक्री, लोकांना मिळाले फ्लेवर्ड ते डॉटेड नवे पर्याय

सकाळ ऑनलाईन टीम

बॉलिवूड

आज आपण अशा एका बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने तीन दशकांपूर्वी कंडोमबाबत लोकांच्या मानसिकतेत मोठा बदल घडवला होता.

pooja bedi condom-ad | esakal

कंडोम

एसटीडीसारख्या रोगांपासून बचाव करण्यासाठी आणि कुटुंब नियोजनासाठी उपयुक्त असलेले कंडोम आज सहज उपलब्ध असतात, पण पूर्वी तसे नव्हते.

pooja bedi condom-ad | esakal

निरोध

९० च्या दशकाच्या सुरुवातीला कंडोमची वेगवेगळी प्रकारे विक्री होत नव्हती, फक्त सरकारी ब्रँड 'निरोध' बाजारात उपलब्ध होता.

pooja bedi condom-ad | esakal

प्रसिद्ध

प्रसिद्ध जाहिरात तज्ज्ञ अलीक पदमसी यांच्या नेतृत्वाखाली पहिली कंडोम जाहिरात तयार करण्यात आली होती.

pooja bedi condom-ad | esakal

दूरदर्शन

या जाहिरातीला सुरुवातीला दूरदर्शनवर बंदी घालण्यात आली, मात्र केबल टीव्हीवर ती दाखवली गेली आणि देशभरात चर्चेचा विषय ठरली.

pooja bedi condom-ad | esakal

कामसूत्र

ही जाहिरात 'कामसूत्र' कंडोमची होती, ज्यात प्रथमच कंडोमला केवळ कुटुंब नियोजनासाठी नव्हे, तर आनंदाच्या दृष्टीकोनातूनही सादर करण्यात आले.

pooja bedi condom-ad | esakal

कंडोम विक्री

या जाहिरातीनंतर कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाली आणि लोकांनी ते अधिक स्वीकारू लागले.

pooja bedi condom-ad | esakal

रेमंड कंपनी

रेमंड कंपनीचे गौतम सिंघानिया यांनी कोरियन कंपनीसोबत मिळून 'कामसूत्र' कंडोम विकसित केला होता.

pooja bedi condom-ad | esakal

गर्भनिरोधक

अलीक पदमसींच्या मते, त्याकाळी पुरुष कंडोमला केवळ गर्भनिरोधक साधन म्हणून पाहत होते, त्यामुळे त्याचा वापर टाळण्याची प्रवृत्ती होती.

pooja bedi condom-ad | esakal

दृष्टिकोन

लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी पदमसींनी कंडोमला आकर्षक बनवण्याचा निर्णय घेतला आणि 'कामसूत्र' या ब्रँडच्या अंतर्गत डॉटेड, फ्लेवर्ड आणि अल्ट्रा-थिन प्रकार बाजारात आणले.

pooja bedi condom-ad | esakal

कंडोम

या नव्या दृष्टिकोनामुळे कंडोम हा फक्त सुरक्षिततेसाठी वापरण्यात येणारा उत्पादन न राहता लाइफस्टाईलचा एक भाग बनला

pooja bedi condom-ad | esakal

पूजा बेदी

या जाहिरातीत पहिल्यांदा काम करणारी अभिनेत्री होती पूजा बेदी, जी कबीर बेदी यांची मुलगी आहे.

pooja bedi condom-ad | esakal

आंघोळ

या जाहिरातीत पूजा बेदी आंघोळ करताना दिसली होती, ज्यामुळे ती चर्चेचा विषय बनली होती.

pooja bedi condom-ad | esakal

दृष्टिकोन

पूजा बेदी यांनी सांगितले होते की, 'कामसूत्र' कंडोम केवळ सुरक्षिततेसाठी नव्हे, तर महिलांच्या आनंदाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरला.

pooja bedi condom-ad | esakal

अश्लीलता

या जाहिरातीने कोणतीही अश्लीलता न दाखवता लोकांच्या मानसिकतेत बदल घडवला आणि कंडोमबाबत समाज अधिक खुलेपणाने बोलू लागला.

pooja bedi condom-ad | esakal

बाबो ! 'या' अभिनेत्रींनी स्वतःच्या बेस्टफ्रेंडला धोका देत केलं त्यांच्या नवऱ्याशी लग्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood Actress | esakal
येथे क्लिक करा