Kangana Ranaut : कंगना कुणाच्या प्रेमात पडली?

सकाळ डिजिटल टीम

कंगनानं नेहमीच स्वताला बॉलीवूडची क्वीन म्हणवून घेतलं आहे. त्यावरुन तिला अनेकांनी ट्रोल देखील केले आहे.

कंगनाचा एक दिवस असा जात नाही की त्यामुळे ती ट्रोल होत नाही. वादग्रस्त भूमिकेसाठी कंगना ओळखली जाते.

आता कंगनानं बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरशी पंगा घेतला आहे.

करण जोहर म्हणे कंगनाला नेहमीच तिच्या इंग्रजी बोलण्याच्या सवयीवरून चिडवत असे. त्यावर कंगनानं त्याला आव्हान दिले आहे.

यापूर्वी देखील कंगनानं बॉलीवूड माफियामध्ये करण जोहरच्या नावाचा उल्लेख केला होता.

कंगनानं करणला एक दिवस तुला चांगलाच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा दम दिला आहे.

येत्या काळात कंगनाचा देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

आता तर कंगनानं शेयर केलेल्या एका पोस्टनं चाहत्यांना ती प्रेमात पडली असा प्रश्न पडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut Bollywood