Siddaramaiah : सिद्धरामय्यांकडं कोट्यवधींची संपत्ती; मालमत्तेत 'या' मोठ्या वस्तूंचा आहे समावेश

सकाळ डिजिटल टीम

सिद्धरामय्या-शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदाची रेस

कर्नाटकात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदाची रेस सुरू आहे.

रेसमध्ये सिद्धरामय्या पुढे

दोघेही कर्नाटकमधील बडे आहेत. या रेसमध्ये सिद्धरामय्या पुढे आहेत.

सिद्धरामय्या आठ वेळा आमदार

सिद्धरामय्या यांनी याआधी 2013 ते 2018 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. त्यांच्याकडं चांगला अनुभव असून ते एकूण आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

सिद्धरामय्यांकडं 20 कोटींची संपत्ती

सिद्धरामय्या यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडं 20 कोटींची संपत्ती आहे.

साडेचार कोटींची चल संपत्ती

यात जवळपास साडे चार कोटींची चल संपत्ती, तर जवळपास साडे पंधरा कोटींच्या अचल संपत्तीचा समावेश आहे.

50 लाखांची सोन्याची आभुषणे

चल संपत्तीमध्ये त्यांच्याकडे 7 लाख 15 हजारांची रोकड, 63 लाख 26 हजार 449 रुपये बँक डिपॉझिट, 20 हजारांचे बॉन्डस शेअर, 4 लाख 4 हजारांची एलआयसी पॉलिसी, 13 लाख रुपयांची टोयाटो इनोव्हा कार, 50 लाख 4 हजार 250 रुपयांची सोन्याची आभुषणे यांचा समावेश आहे.

6 कोटींचे घर-फ्लॅट

तर अचल संपत्तीमध्ये 1 कोटी 15 लाख रुपयांची शेतजमीन, 3 कोटी 50 लाख रुपयींची जमीन, 5 कोटींची इमारत आणि 6 कोटींचे घर-फ्लॅटचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Leader Siddaramaiah Property