DK Shivakumar : काँग्रेसचे 'संकटमोचक' डी. के. शिवकुमारांकडं संपत्ती किती आहे माहितीये?

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकच्या विजयात सिंहाचा वाटा

डी. के. शिवकुमार यांचा कर्नाटकच्या विजयात सिंहाचा वाटा आहे. त्यामुळंच मुख्यमंत्रीपदासाठी ते प्रबळ दावेदार आहेत.

काँग्रेस हायकमांडला भीती

मात्र, त्यांना मुख्यमंत्री केल्यास त्यांच्यामागं केंद्रीय तपास यंत्रणांचा पुन्हा ससेमिरा लावला जाऊ शकतो, अशी भीती काँग्रेस हायकमांडला आहे.

शिवकुमारांना मिळणार मोठी जबाबदारी

त्यामुळंच हा धोका टाळण्यासाठी सिद्धरामय्या यांच्याकडं मुख्यमंत्रीपदाची धुरा देऊन शिवकुमार यांना नवीन सरकारमध्ये अन्य मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी शक्यता आहे.

कॉँग्रेसचे संकटमोचक

डी. के. शिवकुमार हे कॉँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री होण्याचे खूप जुने स्वप्न त्यांचे आहे.

सलग आठ वेळा आमदार

2018 ला त्यांची संधी हुकली होती. सलग आठ वेळा ते आमदार आहेत. शिवकुमार हे काँग्रेसमधील श्रीमंत नेते आहेत.

डीकेंकडं 840 कोटींची संपत्ती

डीकेंकडं 840 कोटींची संपत्ती आहे. 2018 ला निवडणूक आयोगाला त्यांनी याबाबत माहिती दिली होती.

संपत्ती 1 हजार कोटींच्या पार गेल्याची चर्चा

सध्या त्यांची संपत्ती 1 हजार कोटींच्या पार गेल्याची चर्चा आहे. यात त्यांच्या 101 कोटी रुपयांच्या चल, तर 738 कोटींच्या अचल संपत्तीचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar Property