Vaishali Patil
आपल्या मेहनतीच्या जोरावर कार्तिक आर्यनने फिल्मी दुनियेत एक खास स्थान निर्माण केले आहे.
त्याने 2011 मध्ये 'प्यार का पंचनामा' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'सोनू के टीटू के स्वीटी', 'लुका छुपी' आणि 'पति पत्नी और वो' सारखे यशस्वी चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले.
कार्तिक 22 नोव्हेंबरला त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याच्या संपत्तीबद्दल जाणुन घेवूया.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिकची एकूण संपत्ती 46 कोटी रुपये आहे.कार्तिक मुंबईत एका आलिशान घरात राहतो. कार्तिककडे मुंबईतील वर्सोवा येथे एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत 1.60 कोटी रुपये आहे.
एका चित्रपटासाठी कार्तिक 10 कोटी रुपये फी घेतो. तर जाहिरातींमधूनही तो करोडो रुपये कमावतो.
कार्तिक एका महिन्यात 50 लाखांपेक्षा जास्त कमावतो, तर त्याचे वार्षिक उत्पन्न 6 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.
कार्तिककडे BMW 5 Series 520D , McLaren GT 3, Mini Cooper S, Lamborghini Urus Capsule आणि Porsche 718 Boxster सारख्या अनेक लक्झरी कारचे कलेक्शन आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक सध्या 'चंदू चॅम्पियन', 'भूल भुलैया 3', 'कॅप्टन इंडिया' आणि 'आशिकी 3' या सारख्या चित्रपटांचा भाग आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.