Karthik Aryan : आई जिंकली कार्तिकच्या डोळ्यात पाणी...

सकाळ डिजिटल टीम

कार्तिक आर्यनची आईनं कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा सामना केला असून ती लढाई त्यांनी जिंकली आहे.

कार्तिकनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेयर केली आहे. त्यात वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी त्याला आधार दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे कार्तिक आर्यन हा चर्चेत आला आहे.

बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये आता कार्तिक आर्यनचे नाव घ्यावे लागेल.

आगामी काळात तो विविध प्रोजेक्टमधून चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.

कार्तिक आर्यनच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तो लवकरच सत्यप्रेम की कथा नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यात त्याच्या जोडीला कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे.

सध्या प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खानच्या एका चित्रपटामध्ये झळकणार आहे.

याशिवाय हंसल मेहता यांच्या कॅप्टन इंडियाचा देखील महत्वाचा भाग असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karthik Aryan