आरोग्य विमा पॉलिसी घेताय? या गोष्टींकडे द्या खास लक्ष

Aishwarya Musale

वैद्यकीय उपचारांमध्ये मागील काही काळात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य विमा खरेदी करणे अत्यावश्यक होत आहे.

गेल्या काही वर्षांत, देशातील वैद्यकीय खर्च वेगाने वाढला आहे. त्यामुळे भारतात आरोग्य विम्याची मागणी वेगाने वाढली आहे.

तुम्हालाही भविष्यात आजाराशी संबंधित खर्चाच्या तणावातून मुक्त व्हायचे असेल, तर आजच आरोग्य विमा लवकरात लवकर घ्या.

तुम्हीही आरोग्य विमा घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला हेल्थ क्लेम करण्याच्या वेळी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

आरोग्य विमा खरेदी करताना, सर्वप्रथम तुमची विम्याची रक्कम काय आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या गरजेनुसार विम्याची रक्कम निवडावी, जेणेकरून तुमच्या भविष्यातील गरजा पूर्ण करता येतील.

आरोग्य विमा खरेदी करताना प्रतीक्षा कालावधी (Waiting Period) तपासणे फार महत्वाचे आहे. कमी Waiting Period आरोग्य विमा खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

आरोग्य विमा खरेदी करताना, रुग्णालयाचे नेटवर्क तपासणे अत्यंत आवश्यक आहे. कंपनीचे नेटवर्क जितके मोठे तितका आरोग्य विमा चांगला. चांगल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये तुम्हाला कॅशलेस क्लेमची सुविधा मिळते.

आरोग्य विमा घेताना को-पे हा पर्याय निवडू नये. यामध्ये तुम्हाला उपचार खर्चाचा काही भाग स्वत:ला भरावा लागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.