धायरीतील श्री खंडोबाच्या ऐतिहासिक यात्रेतील खास क्षण, फोटो पाहा...

विठ्ठल तांबे

धायरी येथील डोंगरावरील शिवकालीन श्री खंडोबा देवस्थानच्या ऐतिहासिक खोबरषष्टी यात्रेत हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

श्री खंडोबाच्या जयघोषात पांरपारीक बगाड, भंडारा खोबऱ्याची उधळण करण्यात आली.

Khandoba historical yatra dhayari-pune-

मंदिरासह डोंगराचा परिसर भाविकांनी गजबजून गेला होता.

Khandoba historical yatra dhayari-pune-

श्री खंडोबाच्या पहाटे महाअभिषेक पुजेने यात्रेचा प्रारंभ झाला.

Khandoba historical yatra dhayari-pune-

वंशपरंपरागत मुख्य भगत राजाभाऊ कांबळे, मल्हार भक्त बजरंग पंडित यांच्या हस्ते पांरपारीक विधीवत पुजा करण्यात आली. 

Khandoba historical yatra dhayari-pune

मानाच्या देव काठ्यांची ग्रामप्रदक्षिणा, पारंपरिक बगाड, महाआरती, तळीभंडार आदी ऐतिहासिक कार्यक्रमात हजारो भाविक सहभागी झाले होते.

Khandoba historical yatra dhayari-pune

स्थानिक भाविक सचिन राणोजी पोकळे व स्वाती पोकळे यांच्या वतीने भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

Khandoba historical yatra dhayari-pune

खंडोबा डोंगराच्या पायथ्यापर्यंत रस्ता केला आहे. 

Khandoba historical yatra dhayari-pune

भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे मंदिराचा परिसर अक्षरशः फुलुन गेला होता. 

Khandoba historical yatra dhayari-pune

श्री खंडोबाच्या खोबरषष्टी यात्रेला ऐतिहासिक परंपरा आहे. 

Khandoba historical yatra dhayari-pune

सिंहगडाच्या पूर्वेस सह्याद्रीच्या डोंगर रांगांतील उंच डोंगरावर श्री खंडोबाचे शिवकाळापूर्वीचे मंदिर आहे. 

Khandoba historical yatra dhayari-pune

शिवकाळात १६६१ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. 

Khandoba historical yatra dhayari-pune

छत्रपती शिवाजी महाराज यांनी देवस्थानच्या पूजाअर्चेसाठी सण-उत्सावासाठी कायम इनाम जमीन दिली.

Khandoba historical yatra dhayari-pune

त्यातील जमीन आता वनखात्याच्या ताब्यात आहे.

Khandoba historical yatra dhayari-pune

या यात्रेत भाविकांनी मोठी गर्दी केली होती

Khandoba historical yatra dhayari-pune

श्री खंडोबाचे शिवकाळापूर्वीचे मंदिर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khandoba historical yatra dhayari-pune