प्रशांत पाटील
कोण होता हा तरुण क्रांतिकारक? ब्रिटिश सत्तेविरोधात लढताना वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी हौतात्म्य पत्करणारा तरुण म्हणजे खुदीराम बोस. त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची कहाणी आजही देशवासीयांना प्रेरणा देते.
३ डिसेंबर १८८९ रोजी बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात खुदीराम बोस यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्या मनात देशभक्तीची भावना होती. ब्रिटिश सत्तेविरोधात उभं राहण्याची जिद्द त्यांच्या मनात अगदी किशोरवयातच निर्माण झाली.
किशोरवयातच खुदीराम बोस स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय झाले. ब्रिटिशांविरोधात पत्रके वाटणे, जनजागृती करणे आणि क्रांतिकारकांशी संपर्क ठेवणे अशी कामं त्यांनी केली. पुढे ते सशस्त्र क्रांतिकारी चळवळीशी जोडले गेले.
ब्रिटिश न्यायाधीश डग्लस किंग्सफोर्ड हा क्रांतिकारकांवर कठोर कारवाई करण्यासाठी ओळखला जात होता. त्याला लक्ष्य करण्याची जबाबदारी खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांच्यावर सोपवण्यात आली. दोघेही मुजफ्फरपूरला पोहोचले.
किंग्सफोर्ड यांच्या गाडीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. मात्र गाडीची ओळख चुकली आणि किंग्सफोर्ड बचावले. या घटनेत दोन ब्रिटिश महिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर खुदीराम बोस यांच्या शोधासाठी ब्रिटिश पोलिसांनी मोहीम सुरू केली.
घटनेनंतर खुदीराम बोस पकडले गेले. त्यांच्यावर न्यायालयात खटला चालला आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अखेर ११ ऑगस्ट १९०८ रोजी मुजफ्फरपूर तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली.
खुदीराम बोस यांनी वयाच्या १८ वर्षे ८ महिने ८ दिवसांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या बलिदानाने भारतीय तरुणांमध्ये स्वातंत्र्याची भावना अधिक तीव्र झाली. वय लहान होतं, पण देशासाठीचं धैर्य अफाट होतं!
शहीद खुदीराम बोस यांना विनम्र अभिवादन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.