Aishwarya Musale
लिव्हर हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो शरीराला डिटॉक्स करतो. अयोग्य आहार, जास्त प्रमाणात मद्यपान आणि अनुवांशिक कारणांमुळे लिव्हरच्या समस्या वाढू शकतात.
लिव्हरच्या आजारांबद्दल बोलायचे झाले तर त्याची लक्षणे शरीरात आधीपासूनच दिसू लागतात. शरीरात अशक्तपणा, भूक न लागणे, उलट्या होणे, झोप न लागणे, दिवसभर थकवा जाणवणे.
शरीरातील आळस आणि वजन झपाट्याने कमी होणे ही लिव्हर खराब होण्याची लक्षणे आहेत. किडनी खराब झाल्याची काही लक्षणे पायांमध्येही दिसू लागतात.
हेल्थलाइनच्या बातमीनुसार, यकृत निकामी झाल्यास पायाजवळ लाल रंगाचे डाग दिसू लागतात. या खुणा गुडघ्याच्या खाली आणि पायाच्या वर दिसून येतात. पायात दिसणाऱ्या या खुणा दुर्लक्ष करू नका. या खुणा लाल रॅशेस सारख्या दिसतात.
पायाला सूज येणे हे लिव्हर खराब झाल्याचे लक्षण आहे. जेव्हा शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात तेव्हा शरीराच्या खालच्या भागात सूज येऊ लागते. या समस्येला पेरिफल एडेमा म्हणतात, ज्यामुळे पायांवर सूज येते.
पायांमध्ये दिसणार्या नसा निळ्या दिसणे हे लिव्हर निकामी होण्याचे लक्षण असू शकते. लिव्हरमध्ये काही समस्या असल्यास या नसा निळ्या पडतात.
तुम्हाला माहीत आहे का टाचांना वारंवार भेगा पडणे हे देखील लिव्हर खराब होण्याचे लक्षणं आहे. शरीरात व्हिटॅमिन बी ३, ओमेगा-३ आणि ओमेगा-६ च्या कमतरतेमुळे टाचांमध्ये ही समस्या सुरू होते.
पायाच्या तळव्याला वारंवार खाज येणे हे लिव्हर निकामी होण्याचे लक्षण आहे. फॅटी लिव्हर आणि लिव्हर सिरोसिस सारख्या समस्यांमुळे पायाच्या तळव्याला खाज सुटू लागते. जेव्हा शरीरातून टॉक्सिन बाहेर पडू शकत नाही, तेव्हा पायांमध्ये खाज सुटण्याची समस्या उद्भवते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.