केएल राहुलने CSK विरुद्ध खेळतानाच 'विकेटकिपर' धोनीला पछाडलं

प्रणाली कोद्रे

लखनौ सुपर जायंट्सचा विजय

आयपीएल 2024 स्पर्धेत 19 एप्रिल रोजी 34 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सला 8 विकेट्सने पराभूत केले.

KL Rahul | ANI

केएल राहुलचे अर्धशतक

लखनौच्या या विजयात कर्णधार केएल राहुलने 53 चेंडूत 82 धावांची खेळी करत मोलाचा वाटा उचलला.

KL Rahul | ANI

केएल राहुलचा विक्रम

दरम्यान या सामन्यात केएल राहुलने यष्टीरक्षणही केले होते. त्यामुळे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याने 25 व्यांदा आयपीएलमध्ये 50 धावांचा टप्पा पार केला.

KL Rahul | ANI

केएल राहुलने धोनीला पछाडले

त्याचमुळे केएल राहुलने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये एमएस धोनीला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे.

KL Rahul | ANI

धोनीची अर्धशतके

धोनीने आयपीएलमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना 24 अर्धशतके केली आहेत.

MS Dhoni | CSK | IPL | X/IPL

क्विंटन डी कॉक

आयपीएलमध्ये 19 एप्रिल 2024 पर्यंत सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर क्विंटन डी कॉक आहे. त्याने 23 वेळा 50 धावांचा टप्पा पार केला आहे.

Quinton de Kock | ANI

दिनेश कार्तिक

चौथ्या क्रमांकावर दिनेश कार्तिक असून त्याने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये 21 वेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.

Dinesh Karthik | X/IPL

दिनेश कार्तिक

चौथ्या क्रमांकावर दिनेश कार्तिक असून त्याने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये 21 वेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.

Dinesh Karthik | X/IPL

रॉबिन उथप्पा

पाचव्या क्रमांकावर रॉबिन उथप्पा असून त्याने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये 18 वेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.

Robin Uthappa | X/IPL

धोनीबरोबरचा 'तो' क्षण स्पेशलच, KL राहुलचा खुलासा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KL Rahul - MS Dhoni | Instagram