2023 मध्ये किती क्रिकेटपटूंचे दोनाचे चार हात झाले?

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने 26 जानेवारीला मेहा पटेलसोबत लग्नगाठ बांधली.

मैदानावर जमलेली जोडी फोडण्यात तरबेज असलेल्या शार्दुल ठाकूरने गर्लफ्रेंड मिताली परूळकर जोडीदार म्हणून अधिकृत केलं.

भारताचा तरूण खेळाडू ऋतुराज गायकवाडने देखील दोनाचे चार हात केले. त्याने उत्कर्षा पवार सोबत लग्न केलं. ती देखील क्रिकेटपटू आहे.

दुखापतींमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंगरूममध्ये कमी मात्र एनसीएच्या रिहॅबिलिटेशन कॅम्पमध्ये जास्त वेळ घालवलेल्या प्रसिद्ध कृष्णाने वेळेचा सदुउपयोग करत लग्न उरकून टाकलं.

2023 च्या सुरूवातीलाच केएल राहुलने अथिया शेट्टीसोबत विवाह करत सुनिल शेट्टीला सासरा करून घेतलं.

वर्ष संपायला अवघा एक महिना राहिला असताना टीम इंडियात नुकतीत एन्ट्री केलेल्या मुकेश कुमारने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतून ब्रेक घेत दिया सिंह सोबत लग्न केलं.

टीम इंडियाचं दार ठोठावून ठोठावून दमलेल्या सरफराज खाननं अखेर निकाह करून रिकामा झाला. त्याने रोमाना जाहूरला आपली जीवनसाथी निवडलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.