दांडिया नाईटच्या लूकमध्ये 'या' ज्वेलरीने पडेल तुमच्या सौंदर्यात भर

Aishwarya Musale

दांडिया नाईटसाठी चांगला लूक करायचा असेल छान दिसायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे घागऱ्याची निवड.

लेहंगा निवडताना तो जास्त जड नसावा कारण तुम्हाला दांडिया खेळायच्या असतील, मस्त नाचायचं असेल तर घागरा जड असताना तुम्ही हे करू शकत नाही.

लेहंगा घालून तुम्ही केसांची वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकता. केस बांधून तुम्ही आर्टिफिशियल दागिने केसात घालू शकता.

दांडिया नाईटसाठी तयार होताना तुम्ही राजस्थानी किंवा गुजराती लूक करू शकता. काळ्या रंगाचे दागिने, हे दागिने पारंपारिक असायला हवेत.

ब्लॅक मेटलचे दागिने, मांग टीका हे दागिने घाला. राजस्थानी लूक हवा असेल तर, आरसे असणारी ओढणी घेऊ शकता

दांडिया आणि गरबा खेळताना सगळ्यात जास्त जर काही उठून दिसत असेल तर ते आहेत दागिने. दांडिया खेळताना कमरपट्टा खूप उठून दिसतो.

मांग टिका हा स्त्रियांचा सगळ्यात आवडता दागिना आहे. हा दागिना स्त्रियांना पारंपारिक लूक देतो.

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी तुमचा लूक अजून सुंदर बनवते. यात अनेक प्रकार असतात. फ्लोरल ज्वेलरी असते, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी असते, सोनेरी रंगाची असते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.