Mansi Khambe
आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजय एका दुःखद अपघातात बदलला. आरसीबीचा विजयोत्सव बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पार पडला.
१८ वर्षांनंतर आरसीबीने ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी लोक चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचले होते. पण यापूर्वी स्टेडियममध्ये मोठी चेंगराचेंगरी होऊन ७ जणांचा मृत्यू झाला.
आज बेंगळुरूत लोकांनी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केला, त्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. याचप्रमाणे भारतातील चेंगराचेंगरीच्या पाच मोठ्या प्रकारणांबद्दल जाणून घ्या
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यादरम्यान संगम नाक परिसरात २८ जानेवारीच्या रात्री १:३० च्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. त्यात ३० लोकांचा मृत्यू झाला तर ६० हून अधिक लोक जखमी झाले.
२५ जानेवारी २००५ रोजी महाराष्ट्रातील साताराजवळील मांढरदेवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये ३४० हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला होता.
३ ऑगस्ट २००८ रोजी श्रावण महिन्यात हिमाचल प्रदेशातील नैना देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी जमली होती. यावेळी पावसामुळे मंदिरात भूस्खलन झाले आणि लोकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन १४६ लोकांचा मृत्यू झाला.
राजस्थानमधील चामुंडा देवी मंदिरात ३ सप्टेंबर २००८ रोजी दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या काळात २२४ लोकांचा मृत्यू झाला.
जम्मूतील कटरा येथील माता वैष्णो देवीच्या मंदिरात १ जानेवारी २०२२ रोजी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. यात १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.