तुम्हाला जॉब न मिळण्याचं कारण तुमचा Resume असू शकतो!

वैष्णवी कारंजकर

बायोडेटा किंवा रेझ्युम हा नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे.

Resume | Sakal

रेझ्युम हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. रेझ्युममुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप समोरच्यावर पडते.

Resume | Sakal

पण रेझ्युम प्रभावी नसेल, तर तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता कमी होती. प्रभावीपणे रेझ्युम कसा लिहाल? जाणून घ्या काही टिप्स...

Resume | Sakal

शॉर्ट अँड स्वीट

तुमचा रेझ्युम हा जास्त मोठा नसावा. अगदी मोजक्या शब्दांत उपयुक्त माहिती त्यात लिहिलेली असावी.

Resume | Sakal

३० सेकंद

रेझ्युम साधारणपणे तीस सेकंदात चाळता यायला हवा, त्यातून तुमची सविस्तर माहिती मुलाखत घेणाऱ्याला मिळायला हवी.

Resume | Sakal

ई-मेल आयडी

तुमचा अधिकृत आणि प्रोफेशनल मेल आयडी रेझ्युमवर लिहा, ज्यावर तुम्हाला कंपनी मेल पाठवू शकेल. विचित्र मेल आयडीमुळे मेल स्पॅममध्ये जाऊ शकतो.

Resume | Sakal

फोन नंबर

अनेकांकडे एकापेक्षा जास्त नंबर असतात आणि हे सतत बदलत राहतात. पण रेझ्युमवर तुम्हाला तोच मोबाईल नंबर द्यायचा आहे जो सुरू असेल आणि तुमच्या सोबत असेल.

Resume | Sakal

उतरता क्रम

तुमचा शैक्षणिक किंवा नोकरीविषयक तपशील उलट्या क्रमाने लिहा. म्हणजे सध्या जिथे काम करताय, ते पहिल्या क्रमांकावर, त्यापूर्वी काम करत होता, ते दुसऱ्या क्रमांकावर. याच प्रमाणे शैक्षणिक माहिती लिहायची आहे.

Resume | Sakal

यामध्ये तुम्ही कंपनीमध्ये काय काम करत होता, याची अगदी थोडक्यात एका वाक्यात माहितीही द्यावी.

Resume | Sakal

फॉन्ट

रेझ्युमचा फॉन्ट निवडताना दिसायला सुटसुटीत असा फॉन्ट निवडा. दोन ओळींमध्ये, शब्दांमध्ये पुरेसं अंतर असावं. शब्दांची गर्दी करू नये.

Resume | Sakal

स्पेलिंग

स्पेलिंगच्या, व्याकरणाच्या चुका टाळा. तसंच तुमचा फोन नंबर, मेल आयडी वारंवार तपासून घ्या.

Resume | Sakal

फॉरमॅट

अनेकदा रेझ्युमच्या फॉन्टमुळे दुसऱ्या कम्प्युटरवर तो उघडताना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे रेझ्युम नेहमी पीडीएफ फॉरमॅटमध्ये पाठवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Resume | Sakal