Alum Benefits : तुरटीचे खास गुण अन् आश्चर्यकारक फायदे माहितीयत? मग, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

दमा, ताप, खोकल्यावर रामबाण- रात्री झोपताना एक ग्लास दुधात 10 ग्राम खडीसाखर आणि तितकीच तुरटीची पूड एकत्र करून घ्यावी. चांगला आराम मिळण्यास मदत होते.

दुर्गंधीनाशक - ग्लासभर गरम पाण्यात पाव चमचा तुरटी पूड आणि चिमुटभर मीठ घालून त्या पाण्यानं रोज गुळण्या कराव्यात. तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.

केसांसाठी उपयुक्त- आजकाल तरुण वयातच पांढऱ्या केसांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. खोबरेल तेल गरम करून त्यात तुरटीची पूड मिसळावी. या तेलानं डोक्याला मसाज करून अर्धा तास तसेच ठेवावे. नंतर नेहमीप्रमाणे केस धुवून टाकावेत. महिन्यातून 2-3 वेळा उपाय करावा.

उसण भरणे- आखडलेल्या मांसपेशींवर तुरटी आणि हळदीची पूड एकत्र करून तेलातून लावल्यास आराम मिळतो.

स्वच्छ पायांसाठी- कोमट पाण्यात तुरटीची पूड घालून त्यात 20 मिनिटे पाय बुडवून बसा. पाय छान उजळतात.

सौंदर्यप्रसाधन-तुरटी हे उत्तम सौंदर्यप्रसाधन आहे. तुरटीच्या पुडीत थोडे गुलाबजल मिसळून ही पेस्ट चेहऱ्याला लावावी. १०-१५ मिनिटे ठेवून मग धुवून टाकावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alum Benefits