Aishwarya Musale
हृदयविकार आणि कर्करोगाप्रमाणेच मधुमेहाच्या रुग्णांमध्येही देशात दरवर्षी वाढ होताना दिसत आहे. हा रोग होण्यामागे अनेक कारणे आहेत.
खराब अन्न, विस्कळीत जीवनशैली आणि अनुवांशिक समस्या या गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरतात. पण झोपेची कमतरता देखील तुम्हाला मधुमेहाचे रुग्ण बनवू शकते हे तुम्हाला माहीत आहे का ?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांना रोज चांगली झोप लागते, त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
ज्येष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, चांगली झोप येण्यासाठी चांगली जीवनशैली असणेही खूप महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही रोजच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश केला पाहिजे.
दिवसभरात कमीत कमी १५ मिनिटे तरी व्यायाम करण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे.
हलका व्यायाम म्हणून तुम्ही सायकल चालवणे, दोरीवरच्या उड्या मारणे अशा पर्यायांचा अवलंब करू शकता.
चांगल्या लाइफस्टाइलसोबतच जेवणही चांगल्या झोपेसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी रात्री जास्त अगदी पोटभर न जेवण्याचा प्रयत्न करा. रात्री चहा किंवा कॉफीचे सेवन करणे टाळा.
झोपण्याच्या किमान दोन तास आधी रात्रीचे जेवण करावे. तसेच जेवल्यानंतर लगेचच झोपू नका. थोडा वेळ चालावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.