Kolhapur Tirupati Flight : कोल्हापूर-तिरुपती थेट विमानसेवा आजपासून बंद; काय आहे कारण?

सकाळ डिजिटल टीम

तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक

कोल्हापूरहून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन कोल्हापूर-तिरुपती ही विमानसेवा सुरू करण्यात आली.

Kolhapur-Tirupati Direct Flight

प्रवाशांची संख्या अपुरी

मात्र, काही कालावधीनंतर प्रवाशांची संख्या सातत्याने अपुरी असल्याचे विमान कंपनीच्या लक्षात आले.

Kolhapur-Tirupati Direct Flight

विमानतळ प्राधिकरणाला दिली माहिती

त्यामुळे ही सेवा व्यवहार्य नसून ती बंद करणार असल्याचे विमान कंपनीने विमानतळ प्राधिकरणाला कळवले.

Kolhapur-Tirupati Direct Flight

आजपासून विमानसेवा बंद

तसेच आज शुक्रवार (ता. १५) पासून ही सेवा बंद होणार असल्याचे निश्चित झाले.

Kolhapur-Tirupati Direct Flight

कंपनीने विनंती केली मान्य

मात्र, कोल्हापुरातील भाविकांची सोय लक्षात घेऊन विमानतळ प्राधिकरणाने हैदराबादला जाणारे विमान पुढे तिरुपतीला न्यावे, अशी विनंती कंपनीला केली. त्यांनी ती मान्य केली.

Kolhapur-Tirupati Direct Flight

कोल्हापूर-हैदराबाद-तिरुपती विमानसेवा सुरू होणार

त्यामुळे आता कोल्हापूर-हैदराबाद-तिरुपती अशी विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी जरी वाढणार असला तरी विमानसेवा सुरू राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur-Tirupati Direct Flight