KTM चा धमाका! 'सुपर ड्यूक आर' गाडीचं नवं मॉडेल लाँच

Sudesh

केटीएम

स्पोर्ट्स बाईक बनवणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये ऑस्ट्रेलियातील केटीएमचं नाव येतं. या कंपनीने आपल्या एका बाईकचं नवीन मॉडेल लाँच केलं आहे.

KTM Super Duke R New Model | eSakal

सुपर ड्यूक आर

कंपनीने आपल्या Super Duke R 1390 या गाडीचं नवीन मॉडेल लाँच केलं आहे. यामध्ये स्टायलिश लुक आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.

KTM Super Duke R New Model | eSakal

इंजिन

नवीन मॉडेलमध्ये 1350 सीसीचं LC8 इंजिन दिलं आहे. यातील ट्विन मोटर आता 188 bhp पॉवर आणि 145Nm टॉर्क जनरेट करते.

KTM Super Duke R New Model | eSakal

पॉवर

यामध्ये आता कॅम शिफ्ट सिस्टीम दिली आहे. यामुळे टॉर्क आणि पॉवर पूर्णपणे डिस्ट्रिब्यूट होऊन पॉवर लॉस कमी होतो. नव्या बाईकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स दिला आहे.

KTM Super Duke R New Model | eSakal

डिझाईन

या बाईकचं डिझाईन देखील नवीन आहे. यात व्हर्टिकल हेडलॅम्प क्लस्टर, प्रोजेक्टर लेन्स युनिट असणारे स्लिम एलईडी लाईट्स आणि नवीन विंगलेट्स देण्यात आले आहेत.

KTM Super Duke R New Model | eSakal

ड्रायव्हिंग मोड्स

या गाडीमध्ये रेन, स्ट्रीट, स्पोर्ट्स, परफॉर्मन्स आणि ट्रॅक असे पाच ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत. नव्या मॉडेलमधील फ्युएल टँकही मोठा (17.5 लीटर) आहे.

KTM Super Duke R New Model | eSakal

किंमत

ही बाईक भारतात कधी लाँच करण्यात येईल, किंवा याची किंमत किती असेल याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KTM Super Duke R New Model | eSakal