लवकरच संपणार पृथ्वीवरील ऑक्सिजन? तज्ज्ञांनी दिला इशारा

Sudesh

ऑक्सिजन

पृथ्वीवरील जवळपास सर्वच सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळेच ऑक्सिजनला मराठीत प्राणवायू असंही म्हटलं जातं.

Earth Oxygen | eSakal

पृथ्वी

आपल्या सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे, ज्यावर ऑक्सिजन उपलब्ध आहे. मात्र पृथ्वीवर कायम ऑक्सिजन असेल असं नाही.

Earth Oxygen | eSakal

डीऑक्सिजनेशन

पृथ्वीवर येत्या एक अब्ज वर्षांमध्ये वेगाने डीऑक्सिजनेशन प्रक्रिया घडणार आहे. यामुळे पृथ्वीच्या वायुमंडळातून ऑक्सिजन वायू नाहीसा होईल.

Earth Oxygen | eSakal

जीवन होणार नष्ट

यावेळी पृथ्वीवरील ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या सर्व सजीवांचा अंत होईल. यात अर्थातच मानवाचा देखील समावेश असेल.

Earth Oxygen | eSakal

वातावरण

पृथ्वीच्या वातावरणात यावेळी मिथेन ग्रहाचं प्रमाण सर्वाधिक असेल. तसंच दुसऱ्या क्रमांकावर कार्बन डायऑक्साईड हा वायू असणार आहे.

Earth Oxygen | eSakal

ओझोन

एक अब्ज वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच पृथ्वीची ओझोन लेअर पूर्णपणे नष्ट होईल. यामुळे देखील मानवाला पृथ्वीवर राहणं अशक्य होईल.

Earth Oxygen | eSakal

परग्रहावर वस्ती

हे होण्यासाठी आणखी बराच काळ असला, तरी त्यापूर्वी मानवाला दुसऱ्या ग्रहावर रहाण्याची सोय करणं भाग आहे.

Earth Oxygen | eSakal

महासागर संपणार

पृथ्वीवरील ऑक्सिजन संपल्यानंतर आणखी एक अब्ज वर्षांनी पृ़थ्वीवरील महासागर देखील नष्ट होणार असल्याचं भाकित संशोधकांनी वर्तवलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earth Oxygen | eSakal