Lionel Messi : चीनच्या विमानतळावर मेस्सीला घेतलं ताब्यात?

अनिरुद्ध संकपाळ

जगावेगळं चीन

या जगाच्या पाठीवर अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला ओळखत नसणारा व्यक्ती सापडणं दुरापास्त आहे. मात्र या बाबतीत चीनची सीमा सुरक्षा पोलीस जगावेळी ठरली.

बिजिंग

अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सी हा चीनची राजधानी बिजिंग येथील वर्कर्स स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धचा आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी गेला होता.

मेस्सी ताब्यात?

मात्र चीनच्या सीमा सुरक्षा पोलिसांनी अर्जेंटिनाच्या या स्टार फुटबॉलपटूला ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार मेस्सीला वीजा मिळण्यास विलंब झाला होता.

पासपोर्टचा विषय

मेस्सीने अर्जेंटिनाच्या पासपोर्ट ऐवजी स्पॅनिश पासपोर्ट जवळ बाळगला होता. त्यामुळे त्याच्याकडे चीनचा विजा नव्हता. त्यामुळे चीनच्या सीमा सुरक्षा पोलिसांनी मेस्सीला अडवलं.

व्हिडिओ व्हायरल

जवळपास 30 मिनिटे हा वीजा आणि पासपोर्टचा गोंधळ सुरू होता. त्यानंतर मेस्सीला विमानतळाच्या बाहेर जाता आलं. अर्जेंटिनाच्या कर्णधाराला अडवणाऱ्या या चिनी पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाला अन् हे प्रकरण उजेडात आले.

स्पॅनिश पासपोर्ट

स्थानिक माध्यमांनुसार मेस्सीने अर्जेंटिनाच्या पासपोर्टऐवजी स्पॅनिश पासपोर्टचा वापर केला. त्यामुळे हा सर्व गोंधळ झाला. यात मेस्सी चुकलाच पण चीनच्या सीमा सुरक्षा पोलिसांनी ज्या प्रकारे संभाषण केले ते खूप निराशाजनक होते.

प्रकरण चुकीचे हाताळले

तुमच्या देशात इतका महान फुटबॉलपटू येतोय म्हटल्यावर ती खूप गौरवाची गोष्ट असते. हे प्रकरण अत्यंत सौम्यपणे हाताळता आले असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.