T20 वर्ल्ड कपमध्ये 'या' महान खेळाडूंनी केला मोठा पराक्रम!

Kiran Mahanavar

टी-20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. ज्यामध्ये फलंदाजांसोबतच गोलंदाजांचीही भूमिका महत्त्वाची असणार आहे.

इतिहास पाहिला तर अनेक गोलंदाजांनी वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून हॅटट्रिकही केली आहे.

ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया)

2007 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ब्रेट लीने हॅटट्रिक घेतली होती. पहिली हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

कर्टिस कॅम्फर (आयर्लंड)

आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने टी-20 वर्ल्ड कप 2021 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध हॅटट्रिक घेतली.

वानिंदू हसरंगा (श्रीलंका)

2021 टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती.

कागिसो रबाडा

2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने इंग्लंडविरुद्ध हॅटट्रिक घेतली.

कार्तिक मयप्पन (UAE)

2022 मध्ये UAE च्या कार्तिक मयप्पनने श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रम केला होता.

जोश लिटल (आयर्लंड)

टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आयर्लंडच्या जोश लिटलने न्यूझीलंडविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.