प्रेमविवाह अन् घटस्फोट; सचिन पायलट-सारा अब्दुल्ला यांची लव्ह स्टोरी!

कार्तिक पुजारी

घटस्फोट

राजस्थानमधील काँग्रेसचे प्रमुख नेते सचिन पायलट आणि त्यांच्या पत्नी सारा अब्दुल्ला यांचा जवळपास दोन दशकानंतर घटस्फोट झाला आहे.

शपथपत्र

निवडणुकीसाठीच्या शपथपत्रामध्ये सचिन पायलट यांनी आपला घटस्फोट झाल्याची माहिती भरली आहे. त्यामुळे ही माहिती उघड झाली.

फारुख अब्दुल्ला

पत्नी सारा अब्दुल्ला या जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांच्या मुलगी आहेत.

लग्न

सचिन पायलट आणि सारा यांचे २००४ मध्ये लग्न झाले होते. त्यांना आर्यन आणि वेहान नावाची दोन मुलं आहेत.

प्रेम विवाह

पायलट आणि सारा यांचा प्रेम विवाह झाला होता. परदेशात शिक्षण घेत असताना त्यांचे सूत जुळले होते

लंडन

सचिन आणि सारा यांचं प्रेम प्रकरण लंडनमध्ये सुरु होतं. तीन वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. घरच्यांचा विरोध डावलून त्यांनी लग्न केलं.

सामाजिक कार्य

सारा या सामाजिक कार्य करत असतात. तसेच त्या ट्रेंड योगा इन्स्ट्रक्टर आहेत.

फारकत

जवळपास 19 वर्षानंतर त्यांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय का घेतला हे समजू शकलेलं नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sara sachin pilot wife