सकाळ डिजिटल टीम
अगं, तु दुसऱ्या बाजूला उभी आहेस म्हणुनच प्रगतीच्या धावांचा तक्ता हलतोय हे ही पण, तितकेच खरे आहे. कारण… तुझी एकेरी धाव मला चौकार, षटकारांची कायम प्रेरणा देते..हे ही अतीम सत्यच आहे.
जगात हजारों नाती तयार करा पण…त्या हजारों नात्यांमध्ये एक नाते, असे तयार करा की… जेव्हा हजारों विरोधात जातील तेव्हा… ते एक नाते तुमच्या सोबत असेल…! ते म्हणजे बायको.
कळीचं फुलणं हा तर तिचाच गुण, वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खूण.. पाखराचे बोल कुणासाठी गाणे, कुणा येई धुंदी, कुणा येई तराणे... कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद
कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद..
तू खूप प्रेम करतेस म्हणून तुझ्याशी भांडायला आवडते, भांडण झाल्यावर तुझा रुसवा काढायला आवडते.. तू जवळ नसल्यावर तुझी आठवण काढायला आवडते... तुझ्यावर प्रेम करत नाही, हे भासवायला आवडते आणि तू जवळ नसल्यावर तुझ्या आठवणीत रडायला आवडते
आयुष्यभर साथ दयायची का नाही हा निर्णय तुझा आहे.. पण मरेपर्यंत नवरा बनून साथ देईन हा शब्द माझा आहे.
बायकोने भरली माझी रिकामी झोळी, भाग्यवंत मी मला बायको मिळाली भोळी.. प्रणयबंधन आमचे ठरवून जरी झाले, आमच्या पुढे मात्र प्रेमविवाह ही फिके झाले..
कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे…
मी सोबत हात कायमचा, तुझा धरणार आहे..I Love You Bayko
आयुष्यात हजारो मित्र-मैत्रिणी येतात आणि जातात.. पण शेवटपर्यंत साथ देते ती फक्त ‘बायको’ असते..
बायको आहेस तू माझी.. हे जग इकडे तिकडे झालं तरी चालेल, पण माझ्या आयुष्यातील
तुझी जागा नेहमी तीच असेल, जी आज आहे..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.