आयपीएल 2024 मध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवरलेस गेम कोणाचा, लखनौचा की गुजरातचा?

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएलच्या 17 व्या हंगामात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक कमी धावा करणाऱ्या संघांच्या यादीत पाचव्या स्थानावर गुजरात टायटन्स आहे. त्यांनी दिल्ली विरूद्ध 4 बाद 30 धावा केल्या होत्या.

त्यानंतर या यादीत चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्स असून त्यांनी लखनौविरूद्ध 6 षटकात 4 बाद 28 धावा केल्या होत्या.

या यादीत तिसऱ्या स्थानावर लखनौ सुपर जायंट्स असून त्यांनी हैदराबादविरूद्धच्या सामन्यात 6 षटकात 2 बाद 27 धावा केल्या.

पंजाब किंग्जने देखील हैदराबादविरूद्ध पॉवर प्लेमध्ये 27 धावा केल्या होत्या. मात्र त्यांचे 3 फलंदाज बाद झाल्यानं ते या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत.

पहिल्या स्थानावर गुजरात टायटन्स असून त्यांनी बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात 6 षटकात 3 बाद 23 धावा केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.