६.४ कोटी रुपये मोजून संघात घेतलेला स्टार खेळाडू हंगामातून बाहेर

Kiran Mahanavar

एकीकडे मयंक यादवसारखा हिरा सापडल्यानंतर लखनौ संघाला वेगवान गोलंदाजीला स्थैर्य मिळाला.

Mayank Yadav | sakal

तर दुसरीकडे वेगवान गोलंदाज शिमव मावीला दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर व्हावे लागले आहे.

२५ वर्षीय शिवम मावी अखेरचे स्पर्धात्मक क्रिकेट ऑगस्ट २०२३ मध्ये खेळला होता.

उत्तर प्रदेशमधून स्थानिक क्रिकेट खेळणारा मावी यंदाच्या पूर्ण मोसमात दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता.

लखनौ संघाच्या स्पर्धापूर्व झालेल्या सराव शिबिरातही तो दाखल झाला नव्हता.

स्टेस फ्रॅक्चर ही दुखापत त्याला झालेली आहे. परिणामी यंदाच्या आयपीएलमध्ये न खेळताच त्याला मुकावे लागले आहे.

मावी भारताकडून सहा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने खेळला आहे. २०२३ मध्ये तो गुजरात टायटन्स संघात होता.

मात्र एकही सामना खेळण्याची संधी त्याला मिळाली नव्हती. यंदा लखनौ संघाने ६.४ कोटी रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.