या तारखेला 'महापरिनिर्वाण' होणार प्रदर्शित

Chinmay Jagtap

शोषित- वंचितांच्या हक्कासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाने अवघा देश हळहळला होता

त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हंबरठा फुटला होता. त्यांच्या अंत्ययात्रेला असंख्य समुदाय लोटला होता होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा प्रवास आपल्या कॅमेरात टिपलेल्या या नामदेवराव व्हटकर यांच्या जीवनावर आधारित 'महापरिनिर्वाण' या चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नामदेवराव व्हटकर यांची भूमिका प्रसाद ओक यांनी साकारली आहे.

अंजली पाटील, कमलेश सावंत, गौरव मोरे हे कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत.

मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार, हे सध्यातरी गुपित आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.