Supreme Court Decision : शिवसेना कुणाची?

सकाळ डिजिटल टीम

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सत्तासंघर्षाचा निकाल उदया जाहीर होणार आहे. शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण कुणाच्या हाती जाणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, "उद्या घटनापीठाकडून दोन प्रकरणांवर निकाल दिला जाणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद सुरु असल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्रातील शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून निर्णय जाहीर केला जाणार आहे.

या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे की शिवसेनेची धुरा कुणाच्या हाती जाणार, आणि कोणाचे सरकार कोसळणार.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल तसेच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील खटल्यावरही अंतिम निकालही यावेळी जाणार आहे.

अकरा महिन्यांपूर्वी अर्थात जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी ४० सहकारी आमदारांसह बंड केलं होतं.

शिंदेंच्या बंडानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Decision