Mahatma Gandhi : महात्मा गांधींचे हे 10 विचार बदलतील तुमचे आयुष्य!

सकाळ ऑनलाईन टीम

महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.त्यांच्या या काही गोष्टी लक्षात ठेवत तुमचंही आयुष्य बदलू शकतं.

Mahatma Gandhi Thoughts | esakal

हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते

आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल.

तुम्हाला हवा असलेला बदल फक्त तुम्हीच घडवून आणू शकता.

तुमचा आनंद हा तुम्ही केलेला विचार, वक्तृत्व आणि संवादावर अवलंबून असतो.तेव्हा तुमचं वागणं हे अवेदनीय असायला हवं.

कमजोर व्यक्ती क्षमाशील नसतात. याउलट क्षमाशीलतेने माणूस अधिक कणखर बनतो.

जगातील काही माणसे वाईट असतात म्हणून माणुसकीचा महासागर दूषित होत नाही. काही वाईट व्यक्तिंमुळे माणुसकीवरचा विश्वास गमावू नका.

Mahatma Gandhi | esakal

तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.

Mahatma Gandhi | esakal

माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahatma Gandhi | esakal