महिला किसान सशक्तीकरण योजना, सरकारकडून महिला शेतकऱ्यांना मदत

Manoj Bhalerao

महिला किसान सशक्तीकरण योजना

कृषी क्षेत्रातील महिलांची सद्यःस्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणाच्या संधी वाढविण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचा उपघटक म्हणून ‘महिला किसान सशक्तीकरण परियोजने’ची घोषणा केली. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आहे.

Mahila Kisan Yojana | Esakal

ग्रामीण भागातील महिलांना शेतीवर आधारित उपजीविका निर्माण करून देणे, कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविणे, महिलांना गुंतवणुकीसाठी सक्षम करणे या उद्देशाने ही योजना कार्यान्वित केली आहे.

Mahila Kisan Yojana | Esakal

बहुतेक महिला या जमीनमालक नसल्याने शेतकरी म्हणून ओळखल्या जात नाहीत. परिणामी विविध सरकारी योजना, सेवांच्या त्या लाभार्थी मानल्या जात नाहीत. त्यामुळे कृषी क्षेत्रातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

Mahila Kisan Yojana | Esakal

योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात महिलांचा उत्पादक सहभाग वाढविणे, महिलांसाठी शाश्वत कृषी उपजीविकेच्या संधी निर्माण करणे, कृषी क्षेत्रात महिलांचे कौशल्य आणि क्षमता सुधारणे, जैवविविधतेचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी कृषी क्षेत्रातील महिलांच्या व्यवस्थापकीय क्षमता वाढविणे, हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

Mahila Kisan Yojana | Esakal
  • अंमलबजावणी कशी होणार?

    महिला किसान सशक्तीकरण उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येणारे सर्व प्रकल्प कृषी आणि संबंधित कामात गुंतलेल्या महिलांना मदत करण्यात येईल. त्यासाठी सरकारी कौशल्य विकास संस्थांच्या भागीदारीत विविध कार्यक्रम सुरू करण्यात येतात.

Mahila Kisan Yojana | Esakal

महिलांच्या गरजेनुसार साधने आणि यंत्रसामग्री तयार करण्यासाठी उत्पादकांना प्रोत्साहन दिले जाईल. याशिवाय शेतीतील पिकांसह कीटकनाशक व्यवस्थापन, नैसर्गिक माती सुपीकता व्यवस्थापन, पशुधनाला शेतीशी जोडणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग यात महिलांना साहाय्य केले जाईल.

Mahila Kisan Yojana | Esakal

योजनेचे उद्दिष्ट :

  • कृषी क्षेत्रात महिलांसाठी शाश्वत कृषी उपजीविकेच्या संधी निर्माण करणे

  • जैवविविधतेचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी महिलांच्या व्यवस्थापकीय क्षमता वाढविणे

  • शेती आणि बिगर शेती प्रकल्पांच्या अनुषंगाने महिलांची कौशल्ये आणि क्षमता सुधारणे

Mahila Kisan Yojana | Esakal

पात्रतेचे निकष :

अर्जदार महिला कृषी क्षेत्राशी संबंधित असणे गरजेचे आहे. योजनेसाठी आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, शिधापत्रिका, उत्पन्नाचा दाखला अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://mksp.gov.in/

Mahila Kisan Yojana | Esakal

कोणत्या राज्यातील १३ हजार मदरसे बंद पडणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahila Kisan Yojana | Esakal