Mahindra Armado : भारतीय सैन्याला मिळाली अनस्टॉपेबल कार, पाहा फीचर्स

Sudesh

Mahindra Armado

महिंद्राच्या डिफेन्स सिस्टीम विभागाने भारतीय सैन्यासाठी तयार केलेल्या आर्माडो या गाडीची डिलिव्हरी सुरू केली आहे. हे एक आर्मर्ड लाईट स्पेशलिस्ट व्हेईकल (ALSV) आहे.

Mahindra Armado Features | eSakal

इंजिन

महिंद्राने तयार केलेल्या या स्वदेशी गाडीमध्ये 215hp, 500Nm क्षमतेचं 3.2 लीटर टर्बो-डीझेल इंजिन देण्यात आलं आहे.

Mahindra Armado Features | eSakal

टॉप स्पीड

बल्की आणि मजबूत असण्यासोबतच आर्माडो फास्टही आहे. या गाडीचा टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रतितास एवढा आहे.

Mahindra Armado Features | eSakal

पेलोड

या गाडीमध्ये चार लोक बसू शकतात, तसंच यातून तब्बल १ टन वजनाचं सामान नेलं जाऊ शकतं.

Mahindra Armado Features | eSakal

सेफ्टी

सुरक्षेसाठी आर्माडोमध्ये एक बॅलिस्टिक आर्मर देण्यात आलंय. यामुळे अगदी B7 STANAG लेव्हल 2 दर्जाच्या प्रोजेक्टाईल मिसाईलनेही मारा केला, तरीही याला काहीही होणार नाही.

Mahindra Armado Features | eSakal

टायर्स & सस्पेंशन

आर्माडोमध्ये चारही बाजूंनी बिल्स्टेन इंडिपेंडंट सस्पेंशन देण्यात आलंय. ज्यामुळे कशाही प्रकारच्या जमीनीवर ही गाडी आरामात धावते. यामध्ये 318/80 R17 टायर दिले आहेत. पंक्चर झाल्यानंतरही हे टायर 50 किलोमीटर धावू शकतात.

Mahindra Armado Features | eSakal

फीचर्स

यामध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम, जीपीएस, ऑटोमॅटिक ग्रेनेड लाँचर, इलेक्ट्रिक विंच, HF/UHF/VHF रेडिओ, सेल्फ क्लीनिंग एक्झॉस्ट, एअर फिल्ट्रेशन असे हे फीचर्स आहेत.

Mahindra Armado Features | eSakal

फीचर्स

यासोबतच या गाडीमध्ये मल्टी-लेयर्ड बॅलिस्टिक ग्लास, गन हॅच, टॅक्टिकल कमांड अँड कंट्रोल, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असे फीचर्सही देण्यात आले आहेत.

Mahindra Armado Features | eSakal

वापर

भारतीय सैन्याच्या विविध गरजांनुसार आर्माडो बनवण्यात आली आहे. सर्व्हिलियन्स तसेच लाईट कॉम्बॅट या दोन्ही गोष्टींसाठी ही गाडी अगदी परफेक्ट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahindra Armado Features | eSakal