अशी बनवा पौष्टिक-चमचमीत भोगीची भाजी!

Aishwarya Musale

मकर संक्रांत

मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा होतो. पण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी.

भोगी

या दिवशी भोगीची भाजी बनवण्याची परंपरा असते. टेस्ट सोबतच आरोग्यासाठी उत्तम असलेली ही भाजी तुम्हालाही बनवायची असेल तर ही रेसिपी जाणून घ्या.

लागणारे साहित्य 

मोठा बटाटा, वांगी चार ते पाच, एक कप गाजराचे मध्यम तुकडे ,अर्धा कप हरबरा दाणे, अर्धा कप शेंगदाणे, अर्धा कप पावट्याचे दाणे, दोन शेवगा, शेंगेचे तुकडे, दोन चमचे खसखस, बोर.

तेल, मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट, जिरे, कढीपत्ता पाने, दोन चमचे भाजलेल्या तिळाचा कूट, काळा मसाला, चिंचेचा दाट कोळ, किसलेला गूळ, ओलं खोबरं, चवीपुरते मिठ

पातेल्यात तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी द्यावी.

प्रथम बटाटा, ओले चणे, पावटे, शेवग्याच्या शेंगा आणि शेंगदाणे घालून दोन वाफा काढाव्यात. नंतर वांगं आणि गाजर घालून मिक्स करावे. थोडे पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवावे.

मध्यम आचेवर शिजू द्यावे. भाज्या शिजत आल्या की चिंच कोळ आणि काळा मसाला घालावा तसेच लागल्यास थोडे पाणी घालावे. भाज्या शिजल्यावर गूळ, बोरं, तिळाचा कूट, खोबरं टाका.

5-7 मिनिटे झाकण लावून मध्यम आचेवर ठेवावे. त्यानंतर ही भोगीची भाजी तयार आहे.

मकर संक्रांतीला या पाच रंगांचे कपडे परिधान करणे मानले जाते शुभ...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Makar Sankranti | Sakal