मकर संक्रांतीचे हे 5 सुपरफूड्स जे आरोग्याचं करतात रक्षण, जाणून घ्या त्याचे फायदे

Aishwarya Musale

मकर संक्रांती

मकर संक्रांती, हिवाळी हंगामातील एक अतिशय खास सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या उत्सवात आपण सर्वजण अनेक महत्त्वाचे सुपरफूड आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांची चव चाखतो.

हेल्दी सुपरफूड्स

या दिवशी अनेक हेल्दी सुपरफूड्स खाल्ले जातात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तर आज आपण काही खास सुपरफूड्सबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या सेवनाने आपण निरोगी राहू शकतो.

तीळ 

मकर संक्रांतीत काळे आणि पांढरे दोन्ही तिळ वापरले जातात. या दोन तिळांच्या मदतीने विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. त्यांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य राहते. तसेच रक्तदाब आणि जळजळ कमी होते.

इतकंच नाही तर तिळात मुबलक प्रमाणात फायबर असतं, जे पचनासाठी खूप गुणकारी आहे. हे शरीराला पुरेशी ऊर्जा प्रदान करून दीर्घकाळ सक्रिय राहण्यास मदत करते.

गुळ 

मकर संक्रांतीत गुळाचा सर्वाधिक वापर केला जातो. साखरेऐवजी सेंद्रिय गुळाचा वापर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. मधुमेही रुग्णही मर्यादित प्रमाणात गुळाचे सेवन करू शकतात.

शेंगदाणे

शेंगदाणे हे मकर संक्रांतीच्या वेळी खाल्ले जाणारे एक अतिशय लोकप्रिय सुपरफूड आहे. हिवाळ्यात आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकते. शेंगदाण्यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, लोह, झिंक, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.

दही चुरा 

दही चुरा हा एक पारंपारिक पदार्थ आहे, जो सामान्यतः यूपी आणि बिहारमध्ये खातात. मकर संक्रांतीच्या वेळी खाल्लेला हा सर्वात सामान्य पदार्थ आहे. हे पचन आणि हाडांच्या आरोग्यासाठी खूप प्रभावी आहे.

पोंगल 

पोंगल हा एक खास दक्षिण भारतीय पदार्थ आहे. हे तांदूळ, मूग डाळ आणि जिरे, काळी मिरी, हिंग, कढीपत्ता आणि आले यासारख्या महत्त्वाच्या मसाल्यापासून तयार केले जाते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने लोक ते खातात. हे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते.

तिळगूळ घ्या, गोड गोड बोला! मकर संक्रांतीला बनवा स्वादिष्ट तिळाचे लाडू...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.