सेलिब्रिटींसारखी क्लिन अँड क्लियर त्वचा हवीय? घरी बनवा हे सीरम

साक्षी राऊत

सीरम त्वचेसाठी फार फायदेशीर असते. रात्री झोपण्यापूर्वी सीरम लावल्यास डाग, धब्बे कमी होतात आणि चेहऱ्यावर ग्लोसुद्धा येतो. चला तर सीरम कसे बनवायचे ते जाणून घेऊया.

Face Serum

सीरम बनवण्याची पद्धत

अॅलोव्हेरा जेल घ्या, त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि गुलाब जल मिक्स करा. त्यात एक टीस्पून ग्लिसरीन मिक्स करा. हे लिक्विड तुम्ही एका स्वच्छ डब्यामध्ये साठवून तुम्ही त्याचा वापर करू शकता.

Face Serum

या सीरमचा वापर कसा कराल

सीरम लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आता सॉफ्ट कपड्याने चेहरा धुवून घ्या. आता सीरमने चेहऱ्यावर मसाज करा.

त्वचेला हायड्रेट ठेवा

रात्री झोपण्यापूर्वी सीरम लावल्यास त्वचा हायड्रेट राहते. सीरम स्किनवर मॉश्चरायझरप्रमाणे काम करते.

Face Serum

ग्लोइंग त्वचेसाठी फायदेशीर

चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी तुम्ही सीरमचा वापर करू शकता. यात व्हिटॅमिन सी असते. सीरम नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरील डाग, धब्बे कमी करते.

Face Serum

अॅक्नी कमी करण्यास फायदेशीर

काही सीरम अँटी अॅक्नी असतात. यात सॅलिसायलिक अॅसिड असते. ज्यामुळे सीबमचे उत्पादन कमी होऊन चेहऱ्यावरील अॅक्नी कमी होण्यास मदत होते.

Face Serum

डार्क सर्कल्स कमी होतात

डोळ्यांखाली असलेले डार्क सर्कल्स कमी करायचे असतील तर रात्री झोपण्याआधी सीरम लावा. सीरम डार्क सर्कल्स लाइट करण्यास मदत करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Face Serum