आयुष्यात करा फक्त हे बदल, कॅल्शियमच्या कमीसह या समस्या होतील दूर

Aishwarya Musale

प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये व्यस्त झालं आहे. दररोज काम, धावपळ, दगदग अशा अनेक गोष्टींचा सामना लोकांना करावा लागत आहे. त्यामुळे ते स्वतःच्या आरोग्याकडे नीट लक्षही देत नाहीत.

त्यामुळे लोकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. मग अशक्तपणा येणे, शरीरातील कॅल्शियम कमी होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

तुम्हाला माहिती आहे का की आपल्या काही सवयींमुळे किंवा जीवनात बदल करून आपण कॅल्शियमची कमतरता दूर करू शकतो. तर आज आम्ही तुम्हाला काही उत्तम हेल्थ केअर टिप्स सांगणार आहोत.

फिजिकली ॲक्टीव्ह

जर तुमचं काम डेस्कवर बसून असेल तर तुम्हाला शरीराची हालचाल करणं आवश्यक आहे. कामातून ब्रेक घेऊन थोडे चालण्याचा प्रयत्न करा. तसेच दररोज शरीराची हालचाल करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपले शरीर फिजीकली ॲक्टीव्ह राहते.

पाणी

आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासू द्यायची नसते. यामुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे आपण दिवसातून किमान 3 लिटर पाणी प्यावे. तसेच सकाळी नाश्त्यात दिवसातून एकदा हिरव्या भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ खावे. 

लोकांना भेटणे

सध्याच्या काळात प्रत्येकजण फोनवर जास्त वेळ घालवताना दिसतात. यामुळे आपण आपल्या जवळच्या लोकांना जास्त टाईम देत नाही. पण तसं न करता आपण ऑफलाइन म्हणजे लोकांना भेटून वेळ घालवू शकता.

काहीतरी नवीन शिका

प्रत्येकाने आयुष्यात दररोज नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणे आणि यश मिळवणे ही चांगली सवय आहे.  पण यश मिळाल्यानंतर तर गोष्टी शिकणे सोडू नये.

पूर्ण झोप घ्या

लोक आपल्या कामामुळे नीट झोप घेत नाहीत. पण अपुऱ्या झोपेमुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आजारी पडू शकता. त्यामुळे प्रत्येकाने नेहमी 7 ते 8 तास झोपण्याची सवय लावली पाहिजे.

7 फेब्रुवारीपासून सुरु होतोय 'व्हॅलेंटाईन वीक', पाहा लिस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.