'Bye Bye आंटी!' मलायकाच्या फोटोंवर भन्नाट प्रतिक्रिया

टीम इ सकाळ

बॉलीवूडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेली सेलिब्रेटी म्हणून मलायकाचे नाव घेता येईल. वयाची पन्नाशी जवळ आल्यानंतरही तिचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांना आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये मलायकाचे नाव आघाडीवर आहे.

फिटनेस फ्रिक म्हणूनही ती अनेकांच्या चर्चेचा विषय असते. मलायका आणि अर्जुन यांच्या रिलेशनशिपची चर्चा होत असते.

हे दोन्ही सेलिब्रेटी त्यांच्या एका मित्राच्या मेहंदीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावरुन त्यांना ट्रोल करण्यात आले होते.

अर्जुन तर बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड अशा वादात अडकल्यानं नेटकऱ्यांच्या रडारवर असल्याचे दिसून आले आहे.

मलायकाच्या नव्या फोटोशुटवर तिच्या चाहत्यांनी दिला वेगवेगळ्या प्रकारच्या भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका चाहत्यानं मलायकाचा तो लूक पाहिल्यानंतर तिला चक्क बाय बाय आंटी असं म्हटलं आहे.

एकीकडे भलेही मलायकाच्या फोटोंचं कौतूक होत असलं तरी चाहत्यांना तिच्या वयाची भलतीच काळजी असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून अर्जुन - मलायकाच्या लग्नाची चर्चा आहे. याविषयी दोन्ही सेलिब्रेटींनी लग्नाचे संकेत दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.