हॉटेल कामगार ते सरकार हादरवणारा आंदोलक! जरांगे यांचे शिक्षण किती?

साक्षी राऊत

मनोज जरांगे

सध्या मराठा आंदोलनामुळे मनोज जरांगे सगळीकडे चर्चेत आहेत. त्यांनी १७ व्या दिवशी उपोषण सोडले असले तरी मागण्यांच्या पुर्ततेसाठी त्यांनी ४१ दिवसांचा कालवधी सरकारला दिलेला आहे.

Manoj Jarange Patil Education

मनोज जरांगे यांचं मुळ गाव

मनोज जरांगे यांचं मुळ गाव बीड जिल्ह्यातील मातोरी आहे. मात्र ते मागील काही वर्षांपासून अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे स्थायिक आहेत.

Manoj Jarange Patil Education

मनोज जरांगे यांची आर्थिकस्थिती

मनोज जरांगे यांची आर्थिक स्थिती बेताचीच, मात्र त्यांनी मराठा समाजासाठी स्वत:ला झोकून दिलं आहे. त्यांच्याकडे चार एकर जमीन होती. त्यापैकी दोन एकर जमीन त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनासाठी विकल्याचं सांगण्यात येतं.

Manoj Jarange Patil Education

मराठा आरक्षण

मनोज जरांगे हे २०११ पासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी चळवळीत सक्रिय आहे. मनोज जरांगे यांनी शिवबा संघटनेची स्थापना करून मराठा समाजासाठी अनेक आंदोलने केली.

Manoj Jarange Patil Education

मनोज जरांगे यांचे शिक्षण

सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या मनोज यांचे शिक्षण १२पर्यंत झालं आहे.

Manoj Jarange Patil Education

यापूर्वी मनोज जरांगे काय करायचे?

हॉटेलमध्ये काम करत त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली.

Manoj Jarange Patil Education

मराठा समाजासाठी पूर्णवेळ काम करणारे अशी त्यांची ओळख आहे. पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील असे त्यांचे कुटुंब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Education