मराठीतील 'या' गोड अभिनेत्रींची गोंडस मुलं पाहिलीत का?

प्रणाली मोरे

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं दोन जुळ्या मुलींना 2018 मध्ये जन्म दिला. क्रांतीच्या Ziya आणि Zyada या फक्त ५ वर्षांच्या असल्या तरी क्रांतीची दमछाक करताना अनेकदा व्हिडीओतून दिसतात. आजपर्यंत क्रांतीनं आपल्या मुलींचे चेहरे कधीच समोर आणलेले नाही. त्या स्वतः आपले फोटो मोठ्या झाल्यावर पोस्ट करतील असं क्रांती एकदा म्हणाली होती.

Esakal

उर्मिला कोठारे हि केवळ अभिनेत्री नाही तर उत्तम नृत्यांगना देखील आहे. अनेक वर्षांनी तिनं छोट्या पडद्यावर 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून कमबॅक केलं होतं. उर्मिला नेहमीच तिची मुलगी जीजासोबतचे व्हिडीओ,फोटो शेअर करताना दिसते. जीजाचा जन्म २०१७ मध्ये झाला होता. आईप्रमाणेच जीजा देखील दिसायला आणि बोलायला खूप गोड आहे.

Esakal

'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे आज घराघरात मधुराणी गोखले-प्रभुलकर हे नाव पोहोचलं आहे. प्रत्यक्षात मधुराणी स्वराली या ९ वर्षांच्या गोड मुलीची आई आहे. स्वराली पुण्यात तिच्या वडीलांकडे राहते,तर कामानिमित्तानं मधुराणीला तिच्यापासून लांब मुंबईत राहावं लागतंय. पण जेव्हा कधी या माय-लेकी भेटतात तेव्हा आकाश ठेंगणं होतं दोघींना हे त्यांच्या व्हिडीओ-फोटोतून दिसून येतं.

Esakal

मधुरा वेलणकर-साटम हे नाव गेली अनेक वर्षांपासून मराठी नाटक,मालिका,सिनेमात गाजतंय, आतातर तिनं हिंदी वेबसिरीजमध्येही आपली एन्ट्री दणक्यात केली आहे. मधुराप्रमाणेच तिचा मुलगा युवानही खूपच क्यूट दिसतो. मधुरा नेहमी आपल्या मुलासोबतचे फोटो शेअर करताना दिसते.

Esakal

मिनाक्षी राठोड हे नाव मराठी मालिकाविश्वातलं प्रसिद्ध नाव. काही महिन्यांपूर्वीच मिनाक्षीनं एका गोड,गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंतर तिच्यासोबत खास फोटोशूट करत मिनाक्षीनं फोटो शेअर केले होते,ज्यांना लाखो व्हयूज मिळाले होते.

Esakal

समिधा गुरु ही मराठीतील टॅलेंटेड अभिनेत्री. मालिका,सिनेमा,नाटक, आणि सोशल मीडिया अशा अनेक प्लॅटफॉर्मवर ती आपल्या अभिनयाची चुणूक नेहमीच दाखवत असते. समिधा गुरुला एक स्मार्ट मुलगी आहे,जिचं नाव दुर्वा आहे. या मायलेकी अनेकदा इन्स्टा रील बनवताना दिसतात. आणि त्यांच्या डान्सिकल व्हिडीओवर अनेकदा चाहतेही ठेका धरताना दिसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal